<
फैजपूर-(मलिक शकिर) – येथील सुमंगल लॉन्स येथे रावेर विधानसभा क्षेत्र मधील पत्रकारांची परिषद माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली याप्रसंगी त्यांनी रावेर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार ना हरिभाऊ जावळे हे दोन वेळा खासदार दोन वेळा आमदार राहूनही या मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास साध्य करू शकले नाही त्यांना आम्ही हे आठ मुद्दे मांडत आहोत त्याचे त्यांनी निरसन करावे.
1)रावेर यावल भागातील युवकांसाठी त्यांच्या वीस वर्षाच्या राजकीय जीवनात रोजगार देणारी एकही इंडस्ट्री उद्योग का आणला नाही.
2) केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री राज्याचे मंत्री यांच्याशी असलेला जवळिकीचा फायदा मतदारसंघासाठी का करून घेतला नाही.
3)दिल्ली दरबारी व मुंबई दरबारी असलेले वजन मतदार संघाच्या फायद्यासाठी का वापरले नाही.
4) हार्टीकल्चर ट्रेन मुळे नवीन केळी ग्रुपला केळी पाठविणे सोयीचे होते ती ट्रेन बंद झाल्यावर ही पुन्हा सुरू करण्यासाठी आपण आपले राष्ट्रीय वजन का वापरले नाही.
5) राज्याला जलसंपदा मंत्र्यांचे उजवे हात अशी ख्याती असतांना 2014 साली तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित दादा पवार यांची मान्यता असलेल्या तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा नियामक मंडळाने मान्यता दिलेला सौर ऊर्जा प्रकल्पाला खोडा कोणी घातला.
6)2017 मध्ये हे आपणही त्या प्रकल्पाचा मोठा बोभाटा केला होता त्याचे पुढे काय झाले.
7)मी मंजूर केलेले यावल चे क्रिडा संकुलन व प्रशासकीय इमारत अद्याप पर्यंत पूर्ण का केले नाही.
8)रावेरच्या पुर्वभागात भूगर्भातील जलपातळी वाढावी यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळ मंजूर केलेले भोकर नदीपात्र वरील चार बंधारे व विहिरी का झाले नाही.
9) रावेरच्या पूर्वभागातील पातोंडी, केऱ्हाळा,मंगरूळ , अहिरवाडी ,खानापूर , मोरगाव ,खिरवड, नेहेते, धुरखेडा, नांदूरखेडा, अजंदा या गावात या रस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले.
10) 2014 निवडणुकीच्या आधी आपण मंगरूळ व सुखी धरणाची उंची वाढवण्याचे हे वचन दिले होते ते वचन कुठे गाडले गेले.
11)शहराच्या नगरपालिकेला आपण निधी का दिला नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावी असे पत्रकार परिषदेत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी आमदार रमेश चौधरी, जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, मसा का संचालक संजीव महाजन, फैजपूर नगरसेवक कलीम खान हैदरखान मनियार, माजी नगरसेवक शेख जाफर , जिल्हा काँग्रेस चिटणीस तथा माजी नगरसेवक केतन किरंगे, प्रभात चौधरी सर , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा मुकेश येवले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुनवर खान , आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिल रुबाब तडवी, यासह आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.