<
(ईश्वर लिधुरे) – पीएम किसान सन्मान योजनेचा मोठा गाजावाजा केला, त्यास जाहिर करूनही वर्षाहून अधिक कालखंड लोटला तरी अजूनही जिल्ह्यातील संपुर्ण शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाहिए. याबाबत प्रशासन शेतकऱ्यांना कोणतीही वैध माहित पुरवत नाही. लोक प्रतिनिधी तर जिल्ह्यास असून नसल्यासारखे आहे. याबाबत सदर पीएम किसान सन्मान पोर्टल वर सविस्तर माहिती घेतली असता शेतकऱ्यांचे जेडीसीसी बँक चे खाते अवैध असल्याचे पीएम किसान सन्मान पोर्टलने शेरा मारलेला आहे. काही शेतकऱ्यांना याच बँकेच्या खात्यांमध्ये हा लाभ मिळाला आहे. या तांत्रिक घोळावर प्रशासन ढिम्म दिसून आलेल आहे. जिल्हा प्रशासनास हा सर्व प्रकार माहित असूनही त्यावर मुग गिळून गप्प बसलेल दिसत. सदर खाते अवैध असल्याचा शेरा ७/८ महिने झालेत कुठ वर्ष लोटल पण प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाहीत. जिल्हाधिकारी यात खुप वेळकाढू भुमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत मी आपले सरकार पोर्टल वर सुचना केली असता अत्यंत बेजाबदार उत्तर देण्यात आले कि शेतकऱ्यांना पोस्टात खाते काढायचे आदेश काढलेले आहेत. यात जिल्हा प्रशासन डोळे मिटून काम करतय असच वाटत किंवा शेतकरी विरोधी काम करतय असंच दिसतेय. देशात जनधन योजनेनं जवळपास प्रत्येक नागरिकाच खात उघडले गेले आहेत. त्यामुळे नविन खाते काढण्याचा फार्स करून शेतकरी व पोस्ट विभागास वेठीस न धरता जे आहे ते सरकारी बँकांचे खाते क्रमांच घेवून सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यत पोहचवा.