<
विद्यार्थी , वृद्ध व नागरिकांना मिठाई वाटून केली दिवाळी साजरी.
मुक्ताईनगर(उंचदा) -(विनोद चव्हाण)-परिसरातील शेमळदे गावात केसराई बहुउउद्देशीय संथ्या शेमळदे व युवक पंचशील बौद्ध समाज मंडळ शेमळदे ता. मुक्ताईनगर तर्फे दिवाळीत विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करून दिवाळी साजरी करण्यात आली .
त्यामध्ये नागरिकांमध्ये दिवाळी सनाविषयी व दिवाळीचे महत्व पटवून देऊन जनजागृती केली . दिवाळीत पैसे , लायटिंग , कापडे आदी खर्चिक बाबींवर पैसे खर्च न करता तो पैसा आपापल्या कुटुंबावर ( शिक्षण ,आजार) यावर खर्च करावा , जर शक्य झाल्यास तोच पैसा गरजवंत , गरीब विद्यार्थी यांच्या शिक्षणावर खर्च करावा. आपल्या अश्या कृती मुले गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येइल व उद्याच देशाच भविष्य होईल असे प्रतिपादन केसराई बहुउद्देशीय संथ्या व युवक पंचशील बौद्ध समाज मंडळ शेमळदे संस्थेचे अध्यक्ष आकाश भालेराव यांनी लोकांमध्ये जनजागृती करताना केले.
विद्यार्थी, वृद्ध ,नागरिकांना मिठाई वाटप
युवक पंचशील बौद्ध समाज मंडळ शेमळदे व केसराई बहुउद्देशीय संथ्या शेमळदे तर्फे गावात दिवाळीत गरीब विद्यार्थी , वृद्ध, तसेच नागरिकांना मिठाई वाटून व आदी मदत करून दिवाळी साजरी करण्यात आली .
यावेळी केसराई बहुउद्देशीय संथ्या शेमळदे व युवक पंचशील बौद्ध समाज मंडळ शेमळदे संथ्याचे अध्यक्ष आकाश भालेराव , युवक पंचशील बौद्ध समाज मंडळ सचिव रोहिदास मेढे , कार्यध्यक्ष अनमोल भालेराव, सभासद शांतीलाल जाधव, हार्दिक खैरनार , युवा कार्यकर्ते अश्विन भालेराव, विवेक जाधव , अनिल भोई , योगेश थोरात, जेष्ठ नागरिक रवींद्रनाथ भालेराव, विनोद जावरे व गावातील नागरीक उपस्थित होते.
वरील उपक्रम राबवून केसराई बहुउद्देशीय संथ्या शेमळदे व युवक पंचशील बौद्ध समाज मंडळ शेमळडे यांच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे .