<
शेतकऱ्यांचे तहसिलदारांना निवेदन
एरंडोल- (शैलेश चौधरी)- वादळाची तिव्रता व त्यामुळे झालेल्या बेमोसमी अतीवृष्टीमुळे एरंडोल तालुका परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतातूर झाले आहेत मात्र प्रशासन उदासीन असून अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.
गेल्या आठवड्या पासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे खडके बु।खडके खुर्द,खर्ची,खेडी, आदि एरंडोल तालुक्यातील गावांत मका, कापुस,सोयाबीन ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.नुकसानीची तीव्रता एवढी प्रचंड आहे की, मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत तसेच मक्याचे दाणे गळून पडले आहेत. कापूस वेचणीवर आल्यामुळे त्यात पावसामुळे अंकुर फुटले आहेत, शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे.पिके काढणीवर असताना आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने पिकांसाठी खर्च केलेले पैसे ही शेतकर्यांना मिळणार नाहीत एवढी गंभीर परीस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत व्हावेत तसेच शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी एरंडोल येथे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना समस्त तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर सर्व पंचनामे पूर्ण केले जातील तसेच शेतकर्यांच्या समस्यांप्रश्नी प्रशासकीय अधिकारी या नात्याने लक्ष घालणार असल्याचे तहसिलदार खेतमाळीस मँडम यांनी सांगीतले,या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे पदाधिकारी मा. किशोरभाऊ निंबाळकर व सोबतच पि.जी पाटील सर (माजी सरपंच,खडके-खुर्द),मयूर वाणी(सामाजिक कार्यकर्ते)राजू वंजारी (माजी सरपंच, खडकेसिम),साहेबराव पाटील(माजी सरपंच),बापू पाटील, नारायण पाटील,विलास पाटील,अशोक पाटील त्याचबरोबर खडकेसिम-खडकेखुर्द (गणेशनगर)येथील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.