<
पाचोरा :- पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्याने परिणामाची जाणीव सर्वांनाच होवु लागली आहे. मात्र केवळ जाणीव होवुन फक्त विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावुन त्याचे कुटुंबातील सदस्या प्रमाणे संगोपन केले पाहिजे. असे मत पाचोरा न्यायालयाचे न्यायाधीश एफ. के सिद्दीकी यांनी मांडले. ते पाचोरा वकील संघामार्फत न्यायालयीन आवारात वृक्षारोपणा प्रसंगी बोलत होते.
यावेळी न्यायमूर्ती जी. एस. बडगुजर, एम. एच. हक, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. अविनाश सुतार, सचिव अॅड. रविंद्र पाटील, अॅड. त्रिशीला लोंढे, न्यायालयीन अधिक्षक श्री. चतुर सह वकील संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पक्षकार व सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रविण पाटील यांनी तर नरेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
–