Wednesday, July 23, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“आलीया भोगासी” – दीपक तांबोळी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in लेख, विशेष
Reading Time: 1 min read
“आलीया भोगासी” – दीपक तांबोळी

जाँगिंग ट्रँकवर दहा राऊंड मारुन मी घामेजलेल्या अवस्थेत बाकावर बसलो. एक साठी उलटलेले ग्रुहस्थ तिथे अगोदरच बसलेले होते. बऱ्याच दिवसापासून मी त्यांना या उद्यानात पहात होतो. अर्थात आमचं बोलणं कधी झालं नाही. शहरात हीच समस्या असते कोणी कुणाशी बोलत नाही. प्रत्येकजण आपापल्या कोषात गुरफटलेला. नाही म्हणायला जेष्ठ नागरिकांचे बरेच ग्रुप्स उद्यानात फिरतांना दिसायचे. पण हे ग्रुहस्थ मात्र एकटेच दिसायचे. आज मात्र मी त्याच्याशी बोलायचं ठरवलं.
“नमस्कार सर”माझ्या बोलण्यावर ते दचकले.कदाचित मी त्यांच्याशी बोलेन अशी त्यांना अपेक्षाच नसावी. “नमस्कार नमस्कार”ते हात जोडत म्हणाले. “सर बऱ्याच दिवसांपासून या बाकावर तुम्हाला बसलेलं पहातोय. म्हंटलं आज तुमच्याशी ओळख करुन घ्यावी. कुठे नोकरी करत होतात सर?” “मी सायन्स काँलेजला प्राचार्य होतो. तीन वर्ष झालीत रिटायर्ड होऊन. “”मुलं काय करतात? लग्नं होऊन गेली असतील ना त्यांची?” “हो. मुलगा नासामध्ये सायंटिस्ट आहे. मुलगी कंप्युटर इंजीनियर आहे. बंगलोरला असते एका कंपनीत. तिचे मिस्टरही साँफ्टवेअर इंजिनियर आहेत. तेही बंगलोरमध्येच नोकरी करतात” “अरे वा खुप छान” मी चांगलाच प्रभावित झालो. त्यांनी माझा परिचय विचारला. मी माझ्या नोकरीची माहिती दिली. ” सध्या वेळ मिळत असेल तर आणि हातपाय चालताहेत तोपर्यंत प्रवास करुन घ्या सर “मी त्यांना सुचवलं.” अहो खुप फिरलोय. वेगवेगळ्या परीषदांकरीता मी आजपर्यंत ४१ देशात जाऊन आलोय. आणि भारतातील म्हणाल तर सर्वच राज्यं पायाखाली घातली आहेत “मी शाँक्ड झालो. माणसांच्या चेहऱ्यावरुन त्याच्या कर्तृत्वाचा अंदाज येत नाही हेच खरं. सरांपुढे मी अगदीच नगण्य असल्याची भावना मला छळू लागली. थोड्या गप्पा झाल्यानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. तो पुर्ण दिवस मी सरांच्या प्रभावाखालीच होतो.
त्यानंतर वारंवार आमच्या भेटी होऊ लागल्या. सरांना राजकारणात रस होता त्यामुळे आम्ही सहसा राजकारणावरच बोलायचो. एकदा दोन तीन दिवस सर दिसले नाहीत. चौथ्या दिवशी माझ्याच बाकावर बसलेल्या काही रिटायर्ड लोकांना मी विचारलं”काहो ते देशमुख सर आजकाल दिसत नाहीत” “कोणते देशमुख सर?तीन चार देशमुख आहेत. त्यापैकी कोणते? “मला त्याचं सुरुवातीचं नाव माहीत नव्हतं. “ते नाही का सायन्स काँलेजचे प्राचार्य होते. त्यांचा मुलगा अमेरिकेत नासामध्ये आहे आणि मुलगी कंप्युटर इंजिनियर…….. “माझं वाक्य पुर्ण होण्याच्या आतच हास्याचा स्फोट झाला. सगळे सिनियर सिटीझन्स जोरजोरात हसत होते. “का?काय झालं? “मी आश्चर्यचकित होऊन विचारलं” तुम्हालाही त्यांनी तेच सागितलेलं दिसतंय” “म्हणजे? मी नाही समजलो” मी अजूनच कोड्यात पडलो.
“अहो कसलं नासा आणि कसलं बंगलोर, त्यांचा मुलगा नंदूरबारला कोर्टात शिपाई आहे. आणि मुलगी एका रिक्षावाल्यासोबत पळून गेली आहे. ती आता परभणीला असते” मला जबरदस्त धक्का बसला” काय? पण ते तर म्हणत होते ते प्राचार्य होते म्हणून!” “हो ते प्राचार्यच होते. फार हुशार माणूस. चाळीसएक देशात त्यांनी पेपर प्रेझेन्टेशन केलं असेल. शंभरवर पुरस्कार मिळालेत त्यांना. पण नशीब बघा दोन्ही मुलं नालायक निघाली. बापाचा एकही गुण घेतला नाही त्यांनी” “पण मग ते असं खोटं का सांगतात मुलांबद्दल? “मी थोडंस चिडूनच विचारलं.” अहो एवढा मोठा माणूस ज्याचे हजारो स्टुडंट्स मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत, आपल्या अशा नालायक मुलांबद्दल खरं कसं सांगू शकेल?त्याच्याजागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं”  मला ते पटलं. पण सरांशी बोलल्याशिवाय मनाला समाधान मिळणार नव्हतं.
    आठवड्याने सर परत त्या बाकावर बसलेले दिसले. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी सरळ मुद्द्यावर आलो. “सर तुमच्या मुलांबद्दल ऐकलं . फार वाईट वाटलं” मला काय म्हणायचंय हे त्यांच्या लगेच लक्षात आलं असावं. ते गंभीर झाले. ” शेवटी तुम्हाला कळलंच तर!” ” हो सर. पण सर असं झालंच कसं? तुम्ही इतके हुशार, नावाजलेले…..”
” ती फार मोठी शोकांतिका आहे. सविस्तर सांगतो. मी ग्रँज्युएट झाल्याबरोबर वडिलांनी माझं लग्न त्यांच्या खेड्यातल्या मित्राच्या मुलीशी लावून दिलं. मुलगी दहावी नापास होती पण देखणी होती.त्यातून वडिलांचा आग्रह. शिवाय ‘ आपण तिला पुढे शिकवू ‘असा मलाही आत्मविश्वास वाटत होता. म्हणून मी ते लग्न केलं. मात्र लग्नानंतर बायको अगदीच सुमार बुध्दीची आहे हे माझ्या लक्षात आलं.ती दहावीपर्यंत केवळ वशिल्याने पास होत गेली हे मला नंतर कळलं. तिचे गावातल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते हेही ऐकण्यातं आलं पण ते वयच वेडं असतं असं म्हणून मी मोठ्या मनाने तिला माफ केलं. मी पोस्ट ग्रँज्युएट झाल्यावर एका काँलेजला नोकरीला लागलो. बायकोला शिकवण्याचा मी खुप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. शेवटी मी नाद सोडून दिला आणि पीएचडीच्या तयारीला लागलो.नंतर मुलं झाली. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. इकडे मुलं वाढत होती.तिकडे माझ्या करिअरचा ग्राफ उंचावर जाऊ लागला. मी मुलांना चांगल्या शाळेत टाकलं. पण शाळेतून येणाऱ्या रिपोर्ट्सवरुन लक्षात आलं की मुलांनी दुर्दैवाने आईची सुमार बुद्धी घेतली होती. चांगले क्लासेस, माझं मार्गदर्शन असूनही ती मोठ्या मुष्किलीने पास होत होती. शेवटी मी त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून करिअरवर भर देऊ लागलो. संशोधनं, जागतिक स्तरावरच्या परिषदांमध्ये सहभाग यात मी गुंतून गेलो. शेकडो पुरस्कार जिंकले. इकडे मुलं काँलेजला गेली आणि त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मुलीच्या भानगडींना त्रासून मी तिला पुण्याला पाठवलं. काँलेजला यायला जायला रिक्षा लावून दिली. तर ती रिक्षावाल्यासोबत पळून गेली. मी माझं वजन वापरुन दोघांना पकडून आणलं . पण मुलगी सज्ञान असल्यामुळे काहीच करु शकलो नाही. शेवटी दोघांनी परभणीला जाऊन रजिस्टर लग्न केलं. आता ती तिथेच आहे. तिचा नवरा तिथेही रिक्षाच चालवतो. इकडे मुलगाही काही कमी नव्हता. लहान वयातच त्याला सगळी व्यसनं लागली. त्याचे रंगढंग बघून त्याच्या मामाने त्याला नंदूरबारच्या कोर्टात शिपाई म्हणून लावून दिलं. तिकडेच त्याने एका परजातीय मुलीशी लग्न करुन टाकलं.माझं दुर्दैव हे की मला अनेक लग्नात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण असायचं.पण माझ्या दोन्ही मुलांनी न  सांगता, मला न बोलावताच लग्नं केली. मी प्राचार्य झालो.कुलगुरुपदासाठीही मला आँफर आल्या. पण मी त्या स्विकारल्या नाहीत इतका मी कौटुंबिक परिस्थितीने खचून गेलो होतो. ” बोलता बोलता सर गहिवरले.
” तुमच्या मिसेसने कधी मुलांना सुधारण्याचा प्रयत्न केला नाही? “मी विचारलं” तोच तर मुख्य प्राँब्लेम होता. तिने कायम मुलांना पाठीशी घातलं. माझ्यावर तिचं प्रेम कधीच नव्हतं. त्यामुळे माझ्या बुध्दीमत्तेचा तिने कायम दुस्वास केला. मुलांनीही माझा रागरागच केला. माझी फार इच्छा होती मुलाने सायंटिस्ट होऊन नासामध्ये जावं तर मुलीने कंप्युटर इंजिनियर व्हावं अशी पण मुलांनी माझ्या तोंडाला काळं फासलं” “आता तुमचे कसे संबंध आहेत त्यांच्याशी? “मी विचारलं. “पुर्णपणे तुटले आहेत. मी त्यांना घरी येण्यास मनाई केली आहे. तेही मला कधी बोलवत नाहीत” “अरेरे!” ते ऐकून मला खरंच दुःख झालंमला आँफिसला जायचं असल्याने मी त्यांचा निरोप घेतला. पण संपूर्ण दिवसभर मी त्यांचाच विचार करत होतो.
सरांशी परत भेट झाली तेव्हा मी त्यांना म्हंटलं”सर तुमच्या मुलांनी तुमच्या ज्ञानाचा, बुध्दीमत्तेचा, अनुभवाचा काहीच उपयोग करुन घेतला नाही. पण अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना या सर्वाची गरज आहे.” “म्हणजे? मी नाही समजलो.” “सर अनेक गरीब मुलांना एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षा देण्याची इच्छा असते पण एकतर चांगले कोचिंग क्लासेस नसतात आणि असले तरी त्यांची महागडी फी गरीब मुलांना परवडणारी नसते. अशा मुलांना तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा चांगला फायदा होईल. “सरांचे डोळे चमकले. खुष होऊन ते म्हणाले “वा छान कल्पना आहे. मी अशा मुलांना मोफत शिकवायला तयार आहे” “नाही सर. मोफत शिकवलं तर त्यांना त्याची किंमत वाटणार नाही. अगदी नाममात्र शुल्क घेऊन तुम्ही शिकवू शकता” “चालेल. पण असे विद्यार्थी मिळणार कसे?” “सर तुमची प्रसिद्धी करण्याचं आणि तुम्हाला विद्यार्थी मिळवून देण्याचं काम माझं” “वा वा मग तर फारच छान! “सरांचा चेहरा आनंदाने फुलून गेला . ते पाहून मी पुढे म्हणालो. “सर अजून एक! राग मानू नका पण तुमची आयुष्याची आता फार वर्षं नाही राहीली. ही उरलेली वर्षं आनंदात का घालवू नये” “हो बरोबर. पण मी काय करायला हवं” “सर तुमच्या मुलांच्या बाबतीतली वस्तुस्थिती तर आपण टाळू नाही शकत! आपले संत म्हणून गेलेत आलिया भोगासी असावे सादर’. मुलांबाबतीतले भोग तुम्ही भोगून चुकलात. झालं गेलं गंगेला मिळालं. आता नव्याने सुरुवात करायला हवी” “म्हणजे काय करायला हवं?” ” तुमच्या मुलामुलीला घरी बोलावून घ्या. लहान नातवांशी खेळायचे हेच तर तुमचे दिवस आहेत. नातवंडं मोठी व्हायच्या आत तो आनंद तुम्हाला घ्यायचा आहे “नातवंडाच्या ओढीने सरांचे डोळे भरुन आले. “तुम्ही म्हणताय ते मला कळतंय हो. पण ते वळणार कसं?. त्या दोघांनी मला प्रचंड त्रास दिलाय. आता मीच त्यांच्याकडे नाक घासत जायचं का?” “तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण ते तुम्हांला करायची  गरजच नाही. तुमची परवानगी असेल तर मी ते काम करायला तयार आहे “सरांचा चेहरा उजळला” अहो परवानगीची काय गरज? तुम्ही आजोबा नातवंडांची भेट घालून देताय. त्याच्यासारखं पुण्ण्याचं काम नाही”  त्यानंतरचा पुर्ण महिना धावपळीत गेला. सरांना मी वीस विद्यार्थी मिळवून दिले. त्यांच्या बंगल्यातच क्लासेस सुरु झाले. सरांची शिकवण्याच्या पध्दतीने खुश होऊन त्या वीस विद्यार्थ्यांनी आणखी तीस विद्यार्थी आणले. क्लासची व्यवस्था लागल्यावर मी परभणीला सरांच्या मुलीकडे गेलो. वडिलांचं नाव काढल्यावर सुरुवातीला ती चिडली पण मी समजावून सांगितल्यावर तीला आपली चुक कळून आली. आपण प्रेमात वेडे झालो होतो आणि त्या वेडात आपण चुकीचं वागलो हे तीने मान्य केलं. आपलं माहेर आपल्याला परत मिळतंय याचा तिला आनंद झाला. पुढच्या महिन्यात असलेल्या सरांच्या वाढदिवसाला नवऱ्यासह जरुर येईन असं तिने मला वचन दिलं. त्यानंतर मी नंदूरबारला सरांच्या मुलाकडे गेलो. सरांचं निमंत्रण त्याने साफ नाकारलं. बापाचं तोंडही पहायची इच्छा नाही असं म्हणाला. मी त्याला वेगळ्या पध्दतीने समजावलं. “तुम्ही येणार नाही पण तुमची बहीण येणार आहे. ते पाहून कदाचित सर त्यांची सर्व प्राँपर्टी तिच्या नावावर करतील किंवा  तुमचा हिस्सा समाजसेवी संस्थांना दान करुन टाकतील.बघा विचार करा”. त्याच्या बायकोच्या ते लक्षात आलं असावं. तिने त्याला समजावलं. शेवटी तोही तयार झाला.
सरांच्या विशेष निमंत्रणावरुन मी त्यांच्या वाढदिवसाला गेलो. जंगी पार्टी होती.सरांची मुलगी आणि मुलगा सहकुटूंब हजर होते. उद्यानात सरांना हसणारे सगळे ज्येष्ठ नागरिक, सरांचे विद्यार्थी ही उपस्थित होते. सर खुप आनंदी आणि समाधानी दिसत होते. माझी सर्वांशी ओळख करुन देतांना सरांनी मला जवळ घेतलं.म्हंटले ” हा माझा दुसरा मुलगा. याच्यामुळेच आयुष्य कसं जगावं हे मी शिकलो. आजचा आनंदी दिवस याच्यामुळेच आपल्याला पहायला मिळतोय”  सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सरांनी मला मुलगा म्हंटल्याने सरांची बायको, मुलगा, मुलगी माझ्याकडे वेगळ्याच संशयी नजरेने पहायला लागले. त्यांच्या मनातले भाव ओळखून मी माईक हातात घेतला आणि म्हणालो “घाबरु नका सरांच्या प्राँपर्टीतला एक रुपयासुध्दा मी घेणार नाहीये”हास्याचा एकच स्फोट झाला. मी पाहीलं सर आपले आनंदाश्रू पुसत होते.

दीपक तांबोळी – मो. 9503011250

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव पिपल्स बँकेच्या चेअरमनसह अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल

Next Post

लोहारा येथे मधमाश्याने घेतला एकाचा बळी

Next Post

लोहारा येथे मधमाश्याने घेतला एकाचा बळी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications