<
जळगाव-(प्रतिनिधी) – शासनाच्या कामगार आयुक्त कार्यालया मार्फत विविध क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांना प्रती कामगार ५००० हजार रुपये व त्या कामगाराला तो करत असलेल्या कामासाठी लागत असलेले कामाचे साहित्य वाटप केले जात आहे. जळगावात विविध प्रकारचे कामगार असून शासनाच्या अनुलोम संस्थेने पुढाकार घेऊन या योजनेचा लाभ कामगारांना मिळावा म्हणून जवळपास जिल्हयातील ५४८ कामगारांची कामगार म्हणून नाव नोदणी केली आहे. यासाठी कामगारांनी शासकीय शुल्क सुद्धा भरला असून कामगारांना मात्र आतापर्यंत कोणत्याही स्वरूपाचा लाभ मिळाला नसल्याने तसेच जिल्ह्यातील ५४८ कामगार या योजने पासून वंचित राहिले असल्याचे निवेदन रेमंड येथील कामगार कॉन्ट्रॅक्टर दिलीप लाडवंजारी यांनी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले आहे. निवेदनात आपल्या स्तरावरून कामगार आयुक्त कार्यालायची योग्य चौकशी करून नोंदणी केलेल्या कामगारांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा अन्यथा कामगारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल अशी मांगणी करण्यात आली आहे. मा.अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना कॉन्ट्रॅक्टर दिलीप लाडवंजारी, अनिल जोशी,भूषण लाडवंजारी हे उपस्थित होते.