<
जळगाव(प्रतिनीधी)- जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाऊसा मुळे जागोजागी खड्डे पडले असून त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी. यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी भक्कम पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने आज या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येत असून एम. जे.कॉलेज चौफुली येथून आज दि.६ बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर ना. सीमाताई भोळे, स्थायी समितीचे सभापती सुचीता हाडा, सन्माननीय सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, तसेच अधिकारी सिन्हा साहेब आदी उपस्थित होते.