<
जळगांव(धर्मेश पालवे)-आपल्या आजू बाजूस जेष्ठ नागरिकावर अन्याय झाल्याच किंवा मुलाने आई वडीलास घराच्या बाहेर काढल्याच पाहिलं किंवा ऐकलं असेल. अश्या जेष्ठ नागरिका करिता वृद्धाश्रमात किंवा नातेवाईका कडे राहने भाग पडते. या साठी जेष्ठ नागरिक व वृद्ध माता पिता यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी केंद्र शासनाने अधिनियम-२००७ सुरू केला आहे. या अधिनीयमा नुसार जेष्ठ नागरिक, वृद्ध , वृद्ध आई वडील शारीरिक आर्थिक व इतर कोणत्याही कारणामुळे स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नसल्यास त्याचे मुले किंवा मुली किंवा जवळच्या नातेवाईकास वृद्ध मात्या पित्याचे पालन पोषण करणेस बंधनकारक करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्यास अशी दुर्लक्षित व्यक्ती जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या कडे अथवा संबंधित जिल्ह्यातील विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करून त्यांच्या चरितार्थासाठी मासिक रकमेची मागणी मान्य करून घेऊ शकतात. या कायद्यानुसार संबंधित जेष्ठ नागरिकास न्याय व अधिकारासाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या अश्या प्रकरणात जेष्ठ नागरिकास मासिक १० हजार रुपये पर्यंत भत्ता देण्याचा आदेश संबंधित न्यायाधिकरणास पारित करता येतो. जेष्ठ नागरिकांनी या संदर्भात अधिक माहिती साठी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित जिल्ह्यातील विभागाचे उपविभागीय अधिकारी(महसूल) यांच्याशी संपर्क साधावा. सदर माहिती ही जेष्ठ नागरिक शासन निर्णय अधिनियम ७ नुसार प्रसारित करत आहोत , सत्यते विषयी स्वतः चौकशी करावी.