<
भडगाव-(प्रमोद सोनवणे)- तालुक्यात होत असलेल्या ईद-ए-मिलाद सणानिमित्त भडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आज दिनांक ६ नोव्हेंबर रोजी भडगांव तहसिलदार यांच्या दालनात संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे या होत्या तर यावेळी शांतता कमिटीचे अध्यक्ष व सदस्य तसेच राजकिय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. भडगांव- ईद ए मिलाद हा सण शांततेत पार पाडावा प्रशासनाकडून काही अडचण निर्माण होणार नाही अशी ग्वाही भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे यांनी दिली तसेच पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ईद-ए-मिलाद या सणानिमित्त मार्गात व बंदोबस्तात काही अडचणी येत असल्यास या बैठकीत सुचवावे पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल काही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी ईद-ए-मिलाद सन सामाजिक एकोप्याने साजरा करावा असे सांगितलेत्यानतंर सामाजिक,राजकिय पदाधिकाऱ्यांनी आपल्या सुचना व अडचणी मांडल्या व अडचणी चे निवारण केले जाईल. तसेच ईद ए मिलाद हा सण शांततेत पार पाडावा असे तहसिलदार माधुरी आंधळे व पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी सांगितले. यावेळी बैठक तहसिलदार माधुरी आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकिस नायब तहसिलदार आर.पी. देवकर, पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील तसेच शांतता कमीटीचे अध्यक्ष सदस्य त्याचप्रमाणे भडगांव शहराचे माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, नगरसेवक अमोल पाटील, इम्रान अली सैय्यद, इसाक मलिक, सुरेंद्र मोरे, एस.डी. खेडकर, शिवदास महाजन इकबाल मणियार, पत्रकार प्रमोद सोनवणे, गणेश रावळ, हेमंत विसपुते, अलिमशाह, विठ्ठल पाटील हे उपस्थित होते.