जळगावं(प्रतिनीधी)- रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन ईद-ए-मिलाद निमित्ताने अमन रोटरी फाऊंडेशन, मौलाना आझाद फाउंडेशन, सर सैय्यद अहमद खाँ लायब्ररी जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने १० नोव्हेंबर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आपल्या राज्यात रोज हजार पिशव्यांची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त रक्ताची गरज असते. एकाने रक्तदान केल्यास त्यातून दुसर्याला जीवनदान मिळते. असे मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख हे यावेळी म्हणाले. यावेळी आ. राजूमामा भोळे, एमआयडीसी चे पो.नि. रणजित शिरसाठ,नगरसेवक सादिक खाटीक,अमन रोटरी फाऊंडेशन अध्यक्ष डॉ शरीफ बागवान, मौलाना आझाद फाउंडेशन अध्यक्ष फिरोज शेख,सर सैय्यद अहेमद खा लॅबररी चे सचिव अब्दुल रहुफ शेख, समीर सलीम, रज्जाक कासम, नाजिम निसार, आबीद अली, अमीन बागवान, एजाज अलिम, मुख्तार खान, इब्राहिम खाटीक आदी उपस्थित होते.