एरंडोल-(शैलेश चौधरी)-येथील नगरपालिका कायमच काहीना काही कारणाने चर्चेत राहीली असून शासकीय नियम धाब्यावर ठेवून व अंमलबजावणी बरोबरच आपली मुलभूत कर्तव्ये यांचा विसर येथील अधिकाऱ्यांना पडला आहे. तेरी भी चूप और मेरी भी चूप या तत्वाने येथील कारभार चालत असल्याचे निदर्शनास येत असते. बरोबरच भ्रष्टाचार व बेजबाबदारपणा बाबतीत येथील यंञणेने कमालिचा उच्चांक गाठला आहे, याबाबत अधिक असे कि काही दिवसांपूर्वी एरंडोल शहरातील तरूणाने दि. ०९/१०/ २०१९ रोजी केंद्रीय माहिती अधिकार अधिनीयम – २००५ अंतर्गत न्याय प्रयोजनार्थ एरंडोल नगरपालिका हद्दीतील फुले-आंबेडकर व्यापारी संकुलाचे पहील्या मजल्याचे बांधकामासंबंधी नकाशा सत्यांकित केलेली प्रत मिळावी म्हणून रीतशिर पध्दतीने आवेदन केले असता त्या आवेदनास जनमाहीती अधिकारी तथा अभियंता नगरपालिका एरंडोल यांचेकडून प्राप्त झालेले उत्तर कमालिचे तापदायक व बुचकळ्यात टाकणारे तसेच दिशाभुल करणारे आहे. असे असून कोणाचेही मालमत्तांचे बांधकाम परवानगी व नकाशे विषयक माहिती सार्वजनिक हीत असल्याशिवाय आपणास पुरविता येत नसल्याचे उत्तर नगरपालिका अभियंता तथा जनमाहीती अधिकारी यांचेकडून मिळाले आहे. नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभाराची प्रचीती याठिकाणी येत आहे. प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे ज्या बांधकामासंदर्भातील माहिती मागण्यात आलेली आहे ती कोण्या एकाची वास्तू/मालमत्ता नसून नगरपालिकेचेच व्यापारी संकुल असून बांधकाम परवानगी विषयी माहिती मागीतली नसून तसेच परवानगी घेणार्या व्यक्ती संदर्भातील नाही. असे असतांना मूळ विषयाला हेतूपुरस्कररित्या बगल देऊन बुचकळ्यात टाकणारी, संभ्रम निर्माण करणारी तसेच दिशाभूल करणारी उत्तरे देवून, कानावर हात ठेवून नगरपालिकेस काय साध्य करावयाचे आहे. असा प्रश्न या तरूणाखेरीज सर्वसामान्यांस पडत आहे. बरोबरच नैतिक व मुलभूत कर्तव्यांबाबत येथील प्रशासकीय अधिकारी किती जागृत आहेत हेही यावरून लक्षात येत आहे. यावर प्रथम अपिल दाखल करणार असल्याचे देखील तक्रारदार यांनी सांगितले आहे व वेळ आल्यास द्वितीय अपील देखील दाखल करणार असुन कायदेशीर लढा चालुच राहील असे ही त्यांनी सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.