जळगांव(प्रतिनीधी)- येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन तर्फे भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री व भारतरत्न तसेच हिंदू-मुस्लिम एकते साठी सदैव झटणारे मौलाना अबुल कलाम आझाद यांची १३१ वी जयंती देशपांडे मार्केट येथे उत्साहात साजरी केली. यावेळी सत्यमेव जयते न्युज चे मुख्य संपादक दिपक सपकाळे यांच्या हस्ते मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन पूजन करण्यात आले. तसेच त्यांनी मौलाना आझाद यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख हे बोलताना म्हणाले की शिक्षणाच वय नसतं, शिक्षणाच्या प्रवाहात रहा व इतरांनाही त्यामध्ये सामावून घ्या. तसेच यावेळी चेतन निंबोळकर, प्रकाश नेरकर, संजय वाघ, कापडे, दिनेश नेरकर, जावेद पिंजारी, राजेश जाधव, आदी उपस्थित होते.