<
जळगांव(प्रतिनीधी)- विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित प्रगती विद्यामंदिर, प्रगती माध्यमिक, व प्रगती बालवाडी या शाळेत बालदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुख्याद्यापक शोभा फेगडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी नवनीत तर्फे घेतलेल्या मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेची बक्षीसे श्रीपाद भावसार, राशी ससाणे, राजेश कुंभार, भावेश शिरसाठ, मुकुंद सोनवणे, केदार चौधरी या विद्यार्थ्यांना देण्यात आली. बालविज्ञान परिषद मुंबई येथे विज्ञान प्रदर्शनाला जाणारे कौस्तुभ पवार व सर्वेश पाटील यांचे कौतुक करण्यात आले. जान्हवी पाटील, तेजस पवार, कौस्तुभ पवार, या विद्यार्थांनी चाचा नेहरू विषयी माहिती सांगितली. दिगंबर सोनवणे व सुयोग पाटील यांनी बालगीत सादर केले. संध्या अट्रावलकर यांनी नेहरूंच्या जीवनावर आधारित गोष्ट सांगितली. संध्या सरोदे या पालकांनीही आपली उपस्थिती देऊन एक बालगीत सादर केले. तसेच आपडी थापडी, हांडाफोड, माळीण माळीण, फुगडी, मामाचे पत्र, दोरी उड्या या सारखे पारंपरिक खेळ खेळून विद्यार्थाना या खेळाविषयी माहिती देऊन त्यांना या खेळांचा मनसोक्त आनंद लुटू दिला. या प्रसंगी विद्यार्थाना खाऊ देण्यात आला. तसेच इ ८वी ते १० वी च्या विद्यार्थांनी म्हणी ओळखणे, कौन बनेगा सानपती,वैयक्तिक नृत्य, गीत हे कार्यक्रम घेण्यात आले. बालवाडी विभागाची डबा पार्टी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी ज्योती कुलकर्णी, मनीषा पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश ससाणे सर व बारी सर तर आभार प्रदर्शन विजया पाटील यांनी मानले. चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगलाताई दुनाखे, सचिव सचिन दुनाखे, यांनी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.