<
एरंडोल -(शैलेश चौधरी): शहरातील कॉलनी परीसरातील रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण न झाल्याने अज्ञात व्यक्तीने फक्त खडी पसरवलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून अनोखी समाजसेवा केली आहे. अधिक वृत्त असे की शहरातील धरणगाव रोड भागातील एरंडोल नगरपालिका हद्दीतील साई नगर व लोमा काका नगर या ठीकाणी ठेकेदाराकडून रस्ता काँक्रीटीकरणास सुरूवात करण्यात आली होती परंतु संबंधित ठेकेदाराने अवकाळी पावसामुळे रस्त्याचे काम थांबवले असल्याने व रस्ता अत्यंत चिखलमय झाला असल्याने वाहनचालक व पादचारी तसेच कॉलनीतील रहीवासी सर्वांनाच चालणे जिकीरीचे होत असतांना अज्ञात समाजसेवकाने ठेकेदाराकडून टाकल्या गेलेल्या खडीवर मुरूम टाकून रस्ता काही अंशी वापरायोग्य केला. परंतू ठेकेदारास अटी शर्तींस अधिन राहून काम पूर्ण करावयाचे असतांना संबंधित ठेकेदाराने त्या माती टाकलेल्या मार्गावर तसेच बांधकाम सुरू केले असल्याचे दिसत अाहे.सदरील काम नगरपालिका प्रशासनाने ठेकेदारास दिलेल्या नियम व अटीप्रमाणे होत नसल्याचे चिञ आहे. यामुळे नागरिक त्रस्त व हवालदिल झाले आहेत.या प्रकरणी शहरातील सुशिक्षित बेरोजगार व समाजकारण व प्रशासनाप्रती सुजाण असलेले राहूल रघुनाथ पाटील यांचेकडून पालिका मुख्याधिकारी किरण देशमुख यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. नगरपालिका प्रशासन व ठेकेदार यांनी संपूर्ण अटी शर्तींस अधीन राहून काम पूर्ण करत असल्याचे सांगीतले आहे. यामुळे एकतर पुन्हा नागरीक त्रस्त;प्रशासन मस्त व ठेकेदार सुस्त असा प्रत्यय येत आहे.