<
जळगाव-(प्रतिनिधी)- गेल्या वर्षी जिल्हाधिकारी यांनी जळगावातील सामाजिक संस्था व शेतकऱ्यांना मेहरूण तलावाची खोली वाढवण्यासाठी गाळ काढून नेण्याबाबत आव्हान केले होते. पण जिल्हाधिकारी यांच्या आव्हानाचा उलट फायदा घेत मे यश बिल्डर्स अँड कन्ट्रक्शन या कंपनीने दोन पोकलँड तलावात उतरवून त्याच्या सहाय्याने मुरूम काढून डंपरने ४ ते ५ हजार ब्रास मुरूम बेकायदेशीरपणे वाहून नेल्याबाबतची तक्रार जळगाव च्या माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी व तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांच्याकडे दिनांक ०६ / ०६ / २०१८ रोजी दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल जळगाव च्या नवीन कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी यांनी दिड वर्षानंतर घेतली आहे व २८/ ११ / २०१९ रोजी उपविभागीय कार्यालयात आवश्यक त्या लेखी पुराव्यासह तक्रारदाराला उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे. यामुळे खरच जळगाव चे उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे ह्या कर्तव्यदक्ष असल्याची परिचिती आल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. पुढे संबंधितांवर काय कारवाई होते याकडे मात्र लक्ष लागून आहे.