<
जळगांव-(प्रतिनीधी)-जिजामाता माध्यमिक विद्यालयात हरिविठ्ठल जळगांव येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज त्यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी देवगिरी कल्याण आश्रमाचे अँड. अंजली कुलकर्णी, सचिन कलभांडे, भुषण आग्रे, चंद्रकांत कुलकर्णी, नंदकिशोर सराफ, मंगल पाठक, संजय खैरनार, सुनील वसावे आदी उपस्थित होते. यावेळी किशोर पाटील यांनी भगवान बिरसा मुंडा हे स्वातंत्र्यासाठी हजारो सैनिक सोबत घेऊन कसे विरोधकांना धुळ चारायचे हे आपल्या व्याख्यानातून मांडले. कार्यक्रमाचे नियोजन अंजली हांडे, कांचन साने, रुपाली कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश सोनवणे यांनी केले. व आभार कृष्णा महाले यांनी मानले.