<
जळगांव (प्रतिनिधी) – संविधान जागर समिती च्या वतीने दिनांक 17 नोव्हेंबर वार रविवार रोजी ठीक 3 वाजेला जळगांव येथील पद्मालय विश्राम गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा करण्यात येणारआहे , संविधान दिवस एक वैशष्ट्यपूर्ण व्हावा म्हणून बैठकीला संविधान प्रेमी लोकांनी उपस्थित राहावे, बैठकीला सामाजिक सांस्कृतिक व राजकीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी हजर रहाणार आहेत, तेव्हा संविधानवादी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संविधान जागर समिती चे प्रमुख संयोजक मुकूंद सपकाळे, संजय सपकाळे, भारत सोनवणे, नाना मगरे, बापू निकम, आनंदा तायडे, माजी नगरसेवक राजू मोरे इत्यादींनी केले आहे.