<
स्व.पं.वसंतराव चांदोरकर जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन
जळगाव(प्रतिनीधी)- येथील चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे स्व.पं. वसंतराव चांदोरकर यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दि.१६ रोजी जळगावात अमृताचं देणं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.पं. वसंतराव चांदोरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चांदोरकर प्रतिष्ठानकडून दर महिन्याला एक असे संपूर्ण वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्याता आले आहे. नुकतेच जागतिक रंगभूमी दिन संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाने स्व. पं. वसंतरावांच्या सुमारे पाच तपांच्या संगीत व नाट्य सेवेबद्दल एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्याच कर्मभूमीत अर्थात जळगावात केले असून या संदर्भातील नियोजनासाठी माजी संचालक स्वाती काळे, विद्यमान संचालक विभीषण चावरे, सहसंचालक मीनल जोगळेकर, संदीप बलखंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. नाट्यसंगीताची असणार मेजवानीअमृताचं देणं हा नाट्यसंगीतावर आधारित कार्यक्रम तरुण, उदयोन्मुख कलाकार सादर करणार आहेत. नाट्यसंगीताचा प्रवास उलगडून दाखविणार्या या कार्यक्रमात श्रीया सोंडूर (मुंबई) व अजिंक्य पोंक्षे (रत्नागिरी) हे नाट्यपदे सादर करणार असून त्यांना रक्षानंद पांचाळ, मुंबई (तबला) तर अमित पाध्ये, मुंबई (ऑर्गन) ची साथसंगत करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे निरूपण अस्मिता पांडे करणार आहेत.कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहनकांताई सभागृहात शनिवार आज रोजी सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. जळगावकर रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.