<
पुरवठा विभाग पुन्हा चर्चेत, तहसीलदारांना कारवाई साठी दिले निवेदन
जळगाव(प्रतिनीधी)- तहसिल कार्यालयाच्या कामकाजा बाबत नागरिकांच्या वारंवारी तक्रारी येत आहेत तसेच पुरवठा विभागाचा ढिम्म कारभार नेहमी उघडकीस पडत आहे. जळगाव मधील अनेक धान्य लाभार्थी कुटुंबाना रेशन पासून वंचित रहावे लागत आहे तसेच त्यांचे आधारकार्ड रेशन ला जोडण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. नागरीकांचे आधारकार्ड एक वर्षापासून लिंक होत नसून तहसिल कार्यालयात गेल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात असे युवासेना जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार यांनी बोलताना सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की दि. १५ रोजी शुक्रवारी तहसिल कार्यालयात १२ वा. गेलो तेव्हा तहसीलदार जागेवर नव्हते व पुरवठा विभागाला कुलूप ठोकलेले आढळून आले. नागरीक ताटकळत वाट बघत होते नायब तहसीलदार सातपुते यांना विचारले असता मला माहिती नाही कोण कुठे आहे असे उत्तर देण्यात आले. यासंदर्भात त्यांनी आज नायब तहसीलदार सातपुते यांना कारवाई करण्यासाठी निवेदन दिले तसेच यावर कारवाई साठी पाठपुरावा करु असे ते बोलताना म्हणाले.