<
एरंडोल – (शैलैश चौधरी) – सालाबादाप्रमाणे यावर्षीही महिला व बालविकास विभाग जळगाव यांचेकडून जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम जळगाव येथे दि.१४\११\२०१९ ते १६\११\२०१९ या कालावधित जिल्हाभरातील बालगृहांसाठी ३ दिवसीय बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यात खडके बु.ता.एरंडोल येथिल अनाथ निराधार मुलांचे आणि मुलींचे बालगृहातील बालकांनी सहभाग घेवुन दमदार कामगिरी करुन विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकावली. यात १००मी. धावणे लहान गटात सौरभ पाटील याला व्दितीय पारितोषिक मिळाले,२००मी.धावणे मोठ्या गटात निरंक सोनवणे याला व्दितीय पारितोषिक मिळाले,लांबउडी लहान गटात रोहित रंध्रे याला प्रथम पारितोषिक मिळाले. तद्नंतर क्रिकेट स्पर्धेत संघास उपविजेते पद मिळाले. कबड्डी मोठा गट आणि लहान गट या दोन्ही गटांनी उपविजेतेपद पटकाऊन मोठे यश संपादन केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात लहान गटाने लकडी की काठी…काठी पे घोडा… या गीतास प्रोत्साहन पर बक्षिस मिळाले,त्याच प्रमाणे मुलींमध्ये सुध्दा १००मी. धावणे प्रकारात लहान गटात कुसुम पाटील हिला व्दितीय पारितोषिक मिळाले, २००मी. धावणे लहान गटात कुसुम पाटील हिला प्रथम पारितोषिक मिळाले, गोळाफेक प्रकारात लहान गटात अंजली वानखेडे व्दितीय क्रमांक, लांबउडी प्रकारात लहान गट राधिका दाभाडे, व्दितीय कुसुम पाटील निबंध स्पर्धेत ऋचिका गायकवाड हीने तृतीय क्रमांक मिळवला तर हस्ताक्षर स्पर्धेत अंजली गाढे हीने प्रथम कमांक पटकावला, सांस्कृतीक कार्यक्रमात लहान गटातील सामुहिक नृत्य पापा मेरे पापा..या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला, मोठ्या गृपचे सामुहिक नृत्य ओरे बन्सी बजाए नंदलाला… या नृत्यास व्दितीय क्रमांक मिळाला. या सर्व चिमुकल्यांना मा.जिल्हा प्रमुख सत्र न्यायाधिश श्री.सानप साहेब, पोलिस अधिक्षक श्री.पंजाबराव उगले साहेब, जिल्हाविधीसेवा प्राधिकरण सचिव श्री.ठोंबरे साहेब, जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.दिक्षित साहेब, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.विजयसिंग परदेशी साहेब , अधिक्षक शासकिय मुलांचे बालगृह श्री.आर.पी.पाटील साहेब, जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री.एस . आर. पाटील साहेब, परिविक्षा अधिकारी श्रीमती सारीका मेतकर मॅडम, परिविक्षा अधिकारी सौ.जयश्री पाटील मॅडम या मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष दादासो श्री.प्रभाकर पाटील यांनी विजयी बालकांचे कौतुक केले आणि सर्व प्रकारच्या स्पर्धांसाठी व कार्यक्रमांसाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडीत, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत पाटील, ऋषीकेश ठाकरे, सौ.सारीका पाटील यांनी परिश्रम घेतले.