<
जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पत्रकार दिनानिमित्त “विद्यार्थी संवाद” ह्या मार्गदर्शन पर चर्चासत्राचे आयोजन दिनांक १६ रोजी करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम केवल हॉटेल, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी संवाद हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये यशस्वीरित्या पार पाडला. पहिल्या सत्रात शिबिरासअध्यक्ष प्रा.डॉ प्रकाश कांबळे, वरिष्ठ मार्गदर्शक अभिवक्ता अॅड.प्रविणचंद्र जंगले, प्रा.ज.वि धुमाळे, आणि अन्याय निर्मूलन समिती च्या अध्यक्ष सुचित्रा महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उत्तर महाराष्ट्र प्रदेशाचे सर्व विद्यार्थी तरूण व तरुणी तसेच पालक वर्ग महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनद्वारे ऐतिहासिक विद्यार्थी संवादास सहभागी झाले होतेे. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना वाचून करण्यात आली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शकांनी ज्यूडीसीएल ऍक्ट, विद्यार्थी आणि राजकारण, तसेच सध्याची राजकीय परिस्तिथी आणि विद्यार्थी चळवळ या विषयावर मार्गदर्शन केले, आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ला शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या सत्रात स्टुडंट्स युनियन आयोजित मार्गदर्शन पर चर्चासत्रात एकाच प्लॅटफॉर्मवर विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटनेचे नेते पहिल्यांदाच एकत्र आले होते यात प्रामुख्याने अरुण चव्हाण, प्रकाश राठोड,अँड अभिजित रंधे, निलेश जाधव, रोहन महाजन, विनय कोठारी, अंकित चव्हाण सचिन आवळे, शीतल कांबळे, गौरव फुलपगारे, अविनाश तायडे, विकास मोरे, पियुष तोडकर या सर्वांनी विद्यार्थी संवाद चर्चासत्रात सहभागी झाले तरुण विद्यार्थ्यांच्या मनातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेबद्दलची असलेली चीड, आणि विद्यार्थ्यांच्या असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या गेल्या तसेच उपस्थित संवादातून विविध महत्त्वाचे संवेदनशील प्रश्न सामोरे आले. या प्रश्नाच्या उत्तरस्वरूप मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले, आणि यावर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु)कडून विद्यापीठ प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाकडे लवकरच निवेदन देणार आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजाता वाघोदे आणि प्रा. स्नेहा वासनिक यांनी केले. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी प्रस्ताविकपर भाषणामध्ये विद्यार्थी संवादचे प्रारूप, धेय्य आणि उद्दिष्टे स्पष्ट केले, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक हक्काचा विचारमंच निर्माण करण्याचा महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात मासुचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विचारमंच विद्यार्थ्यांना आपली स्वतःची राजकीय पक्ष/संघटन विरहित ओळख निर्माण करायला निर्णायक ठरेल आणि सर्व सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल म्हणून आम्ही दोन महिन्यांचा महाराष्ट् दौरा निश्चित केला या विद्यार्थी संवादाची सुरुवात दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी अमरावतीतुन झाली आहे. दरम्यान आम्ही कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे येथेही विद्यार्थी संवादचे नियोजन केलेले आहे व याची सांगता दिनांक २९ डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे यापुढील विद्यार्थी संवाद दिनांक २४ रोजी नाशिक येथे होणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे (मासू) संस्थापक अध्यक्ष यांनी केले व उपस्थिताना संघटनेची भूमिका समजावून सांगितली. तसेच मासुचे उपाध्यक्ष सुनिल देवरे यांनी संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे सहसचिव दादाराव नांगरे, प्रा. स्नेहा वासनिक, सुनील देवरे, रोहन महाजन, अरुण चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.