तांदुळवाडी ता.भडगाव-(प्रमोद सोनवणे)- येथील चौदावे वित्त आयोग योजने अंतर्गत ग्रामपंचायत तांदुळवाडी येथील महिला बचत गटाची प्रशिक्षण सहल मा. आण्णा हजारे यांच्या गावी भेट दिली. ग्रामपंचायत तांदुळवाडी येथील महिला बचत गट चौदावा वित्त आयोग प्रशिक्षण सहल ग्रामपंचायत पाटोदा, राळेगण सिद्धी (अहमदनगर) या आदर्श गावात जाऊन झालेल्या विकास कामाची पाहणी केली पाटोदा येथील आदर्श ग्रामपंचायत पाण्याची सुविधा, मोफत पिठाची गिरणी, बंद गटारी, सांडपाणी व्यवस्था, धोबिघाट, गावातील स्वच्छता, सी. सी. कॅमेरे, बेसिंग रुम, ऑटोमॅटिक गरम पाण्याची व्यवस्था, बैठक रूम, स्वलर, नळाचे मीटर, अशा चोवीस तास पाण्याची व विजेची सुविधा आहे. पाटोदा, राळेगण सिद्धी येथे आण्णा हजारे यांनी अत्याधुनिक फळबागा शेती व दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तेथील मुलीं व मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात भर देऊन शंभर टक्के शाळेचा निकाल लागेल अशी काळजीपूर्वक मार्गदर्शन करत राहता त्या गावात वृद्धासाठी वाढदिवस जन्मलेल्या मुला मुलींना कपडे अशे आदर्श राळेगण सिद्धी येथे होतात. प्रशिक्षणासाठी चौदावा वित्त आयोगाच्या वतीने ग्रामसेविका सविता पांडे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, अश्या वर्कर, एफ. एल. सी. आर. पी. व चौदा महिला बचत गटांना मा.आण्णा हजारे (किसन बाबुराव हजारे) यांनी प्रशिक्षण देऊन योग्य ते मार्गदर्शन करून तांदुळवाडी महिला बचत गटांचे कौतुक करण्यात आले. व अश्यापद्धतीने तांदुळवाडी गाव विकसित करण्याचा उंभारट्यावर आहे.