भडगांव(प्रमोद सोनवणे)- भडगांव नगरपरीषद व विकास या समुहा मार्फत शासकीय विश्रामगृह येथे आज रोजी सायंकाळी ६ वाजता बैठक संपन्न झाली. या वेळी सुरेंद्र मोरे यांनी रूपरेषा सांगितले आणि अल्केश निकम यांनी समुहाचा उदेश सांगातला आणी अनिल वाघ यांनी सांगितले की गृपवर कुणीच कुणाला वैयक्तीक आरोपीच्या पिंजरात धरू नका अशी सुचना या वेळी दिल्या गेल्यात तसेच मनोहर चौधरी पक्ष विरहित जर आपण शहराचा विकासाठी आमदार व खासदार यांच्याकडे एकजुट होऊन गेले पाहिजे असे मत त्यांनी या क्षणी मांडले तसेच गृपवर जेवढे सदस्य आहे त्यांनी सर्वांनी गृपवर आपले मत मांडले पाहिजे तेव्हाच आपल्या समस्या काय आहेत ते कळेल अन्यथा आपण गृप स्थापन करून जे ध्येय आणी उदेश हाती घेतला तो पुर्ण करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य हे महत्वाचे आहे. प्रत्येकाने आपले प्रभागातील समस्या हे मांडले पाहिजे ते समस्या पुर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. असा ठराव या वेळी करण्यात आला आहे. यावेळी अल्केश मोरे, सुरेंद्र मोरे, मनोहर चौधरी, निलेश मालपुरे, अनिल वाघ, नरेंद्र पाटील, विनोद अडकमोल, सौरभ देशमुख, अलिम शाह, प्रमोद सोनवणे, हेमंत विसपुते, मुक्तार शेख, अबरार मिर्झा, अमोल कांबळे, रामप्रताप माळी, रविंद्र पाटील, विवेक पवार, साजिद शेख, परेश पाटील, नरेंद्र सुर्यवंशी, नाना सोनवने, अनिल महाजन, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.