<
पाचोरा=भडगांव- (प्रमोद सोनवणे)- श्री. गो. से. हायस्कूल येथे दि. २२ रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, सार्वजनिक आरोग्य केंद्र महाराष्ट्र शासन, तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यामार्फत, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम यासंदर्भात निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेसाठी डॉ. संपदा गोस्वामी डिस्ट्रिक्ट ओरल हेल्थ ऑफिसर व त्यांचे सहकारी पाटील मॅडम उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन व निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा यांचे आयोजन, नियोजन, परीक्षण, या सर्व जबाबदाऱ्या कौंडिण्य सर यांनी पार पाडली, कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील होते . सर्वप्रथम डॉ. गोस्वामी यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांना संबोधले. नंतर अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापकांनी तंबाखू आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून, शाळेपासून आपण लांब ठेवू शकतो हे सह उदाहरण स्पष्टीकरण केले. त्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरनात जिल्हा रुग्णालयामार्फत ट्रॉफी देण्यात आल्या. त्यात वकृत्व स्पर्धेत प्रथम श्वेता आव्हाड, द्वितीय मिताली जैन, तृतीय अश्विनी चव्हाण, त्याचप्रमाणे निबंध स्पर्धेत प्रथम हर्षली बिरदारी, द्वितीय अमृता जोशी, तृतीय धनश्री पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच विजयी विद्यार्थ्यांचे आलेल्या पाहुण्यांचे कौण्डिन्य सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .