<
दिव्यांगासाठी असलेल्या नवीन उपक्रमाला हायमिडीया कंपनी मुंबईच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश
जळगांव(प्रतिनीधी)- विकासासोबतच समाजात अपंग लोकांबद्दल विचार बदलले आहेत. परंतु अद्यापही एक मोठा घटक असा आहे की, जो शारीरिक अक्षमतेमुळे चालणे, बसणे, खाणे आणि बोलण्यात असमर्थ लोकांना आपल्या मधीलच एक समजत नाही. त्यात अनेकदा कुटुंबाची उदासीनता देखील सामील होते. मात्र काही लोक असे असतात, जे या विचारांना बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषकरून मुलांना अपंग समाजासोबत जोडण्यासाठी, त्यांना सर्व सुख देण्यासाठी आपले सर्व काही अर्पण करतात. अपंग मुलांना प्रवाहाच्या दिशेने जोडण्याचे सर्वात महत्वाचे काम शिक्षणाचे आहे. अशातच शारीरिकरित्या कमजोर असलेल्या मुलांना साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक उपक्रम राबविण्याचे धाडस सदगुरु भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळ जळगांव संचलित बालविश्व प्री-स्कुल व स्पेशल चाइल्ड केअर च्या माध्यमातून नव्याने गतिमंद, मतिमंद, दिव्यांग या मुलांसाठी दरवाजे उघडे करण्यात आले असून या कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा व माहिती पुस्तीकेचे अनावरण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी हाय मिडिया कंपनी- मुंबई चे संचालिका सौ सरोज वारके हे होते. तर निवृत्त कोषागार अधिकारी व कृती फाऊंडेशन चे सचिव जी.टी. महाजन, जि.प. अपंग विभाग प्रमुख बि.एन. चौधरी, बालरोगतज्ञ डॉ. संजीव चौधरी, स्त्री रोग तज्ञ डॉ. भावना चौधरी, संस्थेचे अध्यक्ष संदीपदादा चौधरी, डिडिआरसी समन्वयक एस.पी. गणेशकर, माधवबाग हाँस्पिटलच्या संचालिका डॉ. श्रद्धा माळी, श्रेयस महाजन, सर्व शिक्षा अभियान समन्वयक दलू पाटील, शाळेच्या संचालिका सौ भारती चौधरी, शाळेचे संचालक व कृती फाऊंडेशन कार्याध्यक्ष अमित माळी हे यावेळी उपस्थित होते. यावेळी गणेशकर बोलताना म्हणाले की, माझंही मुल इतर मुलांबरोबर समाजात वावरावे यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात ओढाताण असते तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तसेच जिल्ह्यात प्रथमच वय वर्षे ०-६ दिव्यांगासाठी हि शाळा सुरू होत असल्याचे या नवीन उपक्रमामुळे शाळेच्या संचालिकांचे कौतूक करतो. दिव्यांग मुलांना समाजातल्या प्रत्येक घटकाकडून उत्तेजन मिळाल्यास ही मुले आयुष्यात हमखास यशस्वी होतील. त्यांना सहानुभूतीपेक्षा प्रोत्साहनाची गरज आहे. लहान मुलांचा पहिला डाँक्टर व शिक्षक हे त्यांचे पालकच असतात. पालकांनी तसेच शिक्षकांनी या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून काढून त्यांना त्या कलेत पारंगत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसेच खान्देशातील पहिली एकमेव अशी ही शाळा वय वर्षे ०-६ या दिव्यांग मुलांसाठी खुप महत्वपूर्ण ठरेल असे जी.टी.महाजन यावेळी म्हणाले.दिव्यांगांचे एक-दोन प्रकार नसून तर तब्बल २१ प्रकार आहेत. प्रत्येक दिव्यांगांना शासनाकडून वेगवेगळ्या सवलती मिळत असतात, तर दिव्यांगपण हे अनुवांशिक असून दिव्यांग मुल हे जन्मालाच येऊ नये यासाठी प्रतिबंध घालणे गरजेच आहे. तसेच या प्री-स्कुलच्या माध्यमातून राबवली जाणारी संकल्पना महत्वाची आहे, असे यावेळी बि.एन. चौधरी बोलत होते. स्कूलला पाच लाखाचा धनादेश भेटसमाजात दुर्लक्षित घटक म्हणून ओळख असलेले मानसिक अपंग, गतिमंद, आत्ममग्न, दिव्यांग अशा मुलांचे आयुष्य म्हणजे खडतर प्रवासापेक्षाही कठीण. अशा मुलांना उपचाराअंती सर्वसामान्य मुलांच्या बराेबरीने आणता येत नसले, तरीही त्यांना याेग्य प्रशिक्षण दिल्यास, उपचार केल्यास त्यांना किमान स्वत:च्या पायावर उभे राहता येईल. असे सौ सरोज वारके हे यावेळी म्हणाले. तसेच या दिव्यांगासाठी असलेल्या नवीन उपक्रमाला हायमिडीया कंपनी मुंबईच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश यावेळी भेट म्हणून देण्यात आल्या. शाळेच्या संचालिका सौ भारती चौधरी बोलताना म्हणाले की, दिव्यांग मुलांसाठी यापुढे अजून मोठा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी यांनी तर आभार योगीता यांनी मानले. फरमान तडवी, आशिष राजपूत, भावसार, जे.पी. वानखेडे तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.