<
पुणे-(अमोल परदेशी)- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू असून बांधकाम परवानगी बांधकाम नियंत्रण विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे एकीकडे स्मार्ट सिटी मेट्रो सिटी अशी प्रशासन घोषणा करताना दिसत आहे पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम रोखणे येथील प्रशासनातील शहर अभियंता राजन पाटील कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे सुभाष इंगळे यांचे कर्तव्य असताना हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे सजग नागरिक मंच व आपना वतन संघटना यासारख्या सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे या संघटना अनाधिकृत बांधकामे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा त्यावर अधिकारी कारवाई करत नाहीत पिंपरी-चिंचवड पालिकेचे अधिकारी जाणीवपुर्वक अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एमआरटीपी कायद्यानुसार अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी दाखल करून निष्क क्षणाची कारवाई करणे अपेक्षित असताना पालिकेचे अधिकारी नोटीस देऊन फौजदारी दाखल करून अंग काढून घेत आहेत अधिकाऱ्यांच्या विरोधात महापालिका आयुक्त यांच्याकडे दप्तर दिरंगाई २००५ नुसार कारवाई करण्याची लेखी मागणी करून सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत आहेत व अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.