<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूल व पु.ना. गाडगीळ अँन्ड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील रिंग रोड येथील पु.ना. गाडगीळ यांच्या सभागृहात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध जिल्ह्यातील ७८ खेळाडू सहभागी झाले असून यात १४ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय मानांकित झालेले खेळाडू सहभागी झाले होते. विशेषतः या स्पर्धेत दिव्यांग मुलांनी देखील सहभाग नोंदवला होता. धुळे, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, म्हसावद, पाचोरा, चाळीसगाव येथील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला होता. ही बुद्धिबळ स्पर्धा ७, ९, ११, व १५ अशा तीन वयोगटात घेण्यात आली. यास्पर्धेचे उद्घाटन सदगुरु भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप पी चौधरी व पु.ना. गाडगीळ चे व्यवस्थापक श्री पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका सौ भारती चौधरी, माधवबाग हाँस्पिटलच्या डॉ श्रद्धा माळी, कृती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष व जळगांव पोलिस अधीक्षक कार्यालयाचे अमीत माळी, मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख, समीर मैद, वैभव बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. हे बुद्धिबळाचे सामने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रंगले. तसेच जिंकलेल्या स्पर्धेकाला प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह देण्यात आले. भारती चौधरी हे खेळाविषयी माहिती देताना म्हणाले कि, बुद्धिबळ स्पर्धेमुळे मुलांच्या बुद्धिमतेत निश्चितच वाढ होत असून या खेळामुळे स्मरणशक्ती वाढणार असल्याने अभ्यासात सुद्धा प्रगती होणार आहे. बुद्धिबळ हा खेळ शांतपणे खेळण्याचां असून चाली सुद्धा योग्य पद्धतीने खेळणे आवश्यक असते. समोरच्या प्रतिस्पर्ध्याचे मन ओळखण्याची ताकद या खेळामुळे प्राप्त होत असते व तो पुढची चाल काय करणार आहे याचे ज्ञान प्राप्त झाल्याने या खेळात प्राविण्य मिळवता येऊ शकते. श्री. पोतदार बोलताना म्हणाले की, या स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान विद्यार्थ्यांचे कौतुक करतो. तर पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे सर्वोत्कृष्ट खेळाडू- तेजस लोहटे
सात वर्षाखालील वयोगटातील विजयी १) तसीन तडवी- प्रथम २)मंडोरे अर्नव- द्वितीय ३)सरोदे आरुष- तृतीय ४)भार्गव लवंगळे- उत्तेजनार्थ नऊ वर्षाखालील वयोगटातील विजयी १)आमले आराध्या- प्रथम २) ओसवाल जयवर्धन- द्वितीय
अकरा वर्षाखालील वयोगटातील विजयी पंधरा वर्षाखालील वयोगटातील विजयी १)तडवी सानीया- प्रथम २)चोरडिया अस्मीत- द्वितीय ३)जोशी पुर्वा- तृतीय ४)दर्शन गायकवाड- उत्तेजनार्थ मुलींचा गट १)शुक्ला साक्षी- प्रथम २)बाफना पायल- द्वितीय ३)जैन जैन- तृतीय ४) चौधरी अनीका- उत्तेजनार्थ