<
वावडदा/जळगांव(प्रतिनीधी)- जिल्ह्यात परतीचा जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला. परंतु, जळगाव तालुक्यात अद्याप पर्यंत कोणत्याच शेतकर्यांच्या खात्यात ही मदत मिळाली नसल्याने, त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी खासदार उन्मेश पाटील यांना वावडदा परिसरातील सरपंच यांनी विनंती केली. या वेळी खासदार पाटील यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकरी बांधवाना तात्काळ अनुदान देण्यात यावे. व जास्तीत जास्त सहकार्य करावे. असे सांगितले त्यावेळी सरपंच शिरीष पाटिल, स्वप्नील पाटील, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कापडणे, बाळकृष्ण पाटील, सुमित पाटील, डाॅ भरत पाटील, सचिन पाटील, अरूण पाटील, धीरजसिग पाटील, या सह परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.