Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 9 :- संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना   राज्य शासनाच्या 9 जानेवारी, 2017 च्या शासन निर्णयानुसार   त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या जे सैनिक अविवाहीत आहेत व ते देशाचे संरक्षण करतांना शहिद झाले आहेत, अशा अविवाहित शहिद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशितांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 139 अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 127 अन्वये महानगरपालिका व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 105 अन्वये नगरपरिषदा, नगरपंचायती मालमत्ता कराची आकारणी करतात. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या , देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता नि:स्वार्थीपणे देशाचे संरक्षण करताना बजाविण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरीता संरक्षण दलातील शौर्य पदकधारकांना आणि माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेच्या मालमत्ता करातून  9 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार सूट देण्याचा निर्णय  राज्य शासनाने घेतला आहे. तरी संरक्षण दलातील शौर्य पदकधारक सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे करमाफीस पात्रतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे आणि मालमत्ता कर माफीचा लाभ घ्यावा. असे आवाहन  राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी, जळगाव किरण देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिव्यांग दोष/व्यंग असणाऱ्या बालकांची नोंद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे करावी

Next Post

लैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज-डॉ. राजन भोसले

Next Post

लैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज-डॉ. राजन भोसले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo