<
भडगांव(प्रमोद सोनवणे)- तालूका स्तरीय विज्ञांन प्रदर्शनात कै.यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या ‘वन्य जीवा पासून संरक्षण करणारी बंदुक ‘ या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. दि ११ बुधवार रोजी माध्यमिक विदयालय मंहीदळे ता. भडगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विदयालय तांदूळवाडी या विदयालयाचा विद्यार्थी रमजान ईस्माइल खाटीक या विद्यार्थ्यांने ‘वन्य जीव पासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी बंदुक ‘ हे मॉडेल तयार केले होते त्यास इ ५ ते ७ वी या लहान गटात प्रथम क्रमांक मिळाला. कार्यप्रसंगी भडगाव-पाचोरा तालुक्याचे आमदार आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले, त्याप्रसंगी पारोळा एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील हे उपस्थित होते तसेच तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यायांचे कौतुक केले, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक डॉ रविंद्र निकम यांनी त्याचे कौतुक केले व जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या त्यास विज्ञान शिक्षक एस एन पाटील व जी जी वराडे यांचे मार्गदर्शन लाभले.