<
जळगाव(प्रतिनीधी)- गेल्या अनेक वर्षा पासून विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून युवती तसेच शेतकऱ्यांचा प्रश्नावर सरकार दरबारी आवाज उठविणार्या, तसेच सामाजिक समस्यांसाठी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे,उपोषण करणाऱ्या जळगावच्या दिव्या यशवंत पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयकपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चळवळीत काम करणाऱ्या युवतीसोबत पाटील दांडगा संपर्क असून या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार पक्षाचा माध्यमातून तळागाळा प्रयन्त पोहचण्यासाठी खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदेशावरून रुपाली ताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विचार तळागाळापर्यन्त पोहचविण्यासाठी, पक्ष मजबुतीसाठी पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँगेस, उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.