<
जळगाव – येथील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्टतर्फे ख्रिसमस कार्निव्हलअंतर्गत शहरातील महिलांसाठी आरोग्य आणि सौंदर्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे दि. 16 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
गणपती नगरमधील रोटरी हॉलमध्ये सोमवार, दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत होणार्या या आरोग्य व सौंदर्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी नवी दिल्ली येथील ओरिफेमच्या संचालक व ड्रीम कॅचर्स क्लबच्या संस्थापिका अनुराधा खन्ना या येणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी महिलांना हिवाळ्यात घ्यावयाची त्वचेची निगा, वजन कमी करण्याकरिता आवश्यक बाबी, सौंदर्यवृध्दी व आकर्षक व्यक्तिमत्वासाठी मेकअप टीप्स, डायट मार्गदर्शन, बी.एम.आय. टेस्ट याविषयी मार्गदर्शन करण्यासोबतच सहभागी महिलांचा लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्य व सौंदर्यवृध्दीसाठी आवश्यक असणार्या या कार्यशाळेकरिता अत्यल्प प्रवेश शुल्क असून, अधिक माहितीसाठी काजल अग्रवाल 8999411700 आणि दिशा अग्रवाल 9405443983 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्टच्या अध्यक्षा प्रिती दोशी, सचिव नीता परमार यांनी केले आहे.