<
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कुष्ठरोग कक्षातील समन्वयक हेमंत सुभाष कोळी यांना समाजकार्य विषयात पीएच .डी पदवी प्रदान करण्यात आली. हेमंत कोळी यांनी एम .एस .डबब्लू , एमफिल नंतर ‘कोळी समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीचे अध्ययन ‘या विषयी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला आहे . त्यांनी या अगोदर मूळजी जेठा महाविद्यालयातील जलश्री विभागात संशोधक प्राध्यापक म्हणून काम केले असून त्यांनी आजपर्यंत विविध शासकीय समित्यांवर काम केले आहे. त्यांना पीएचडी साठी मार्गदर्शन म्हणून डॉ .संभाजी देसाई , के.सि. ई .एस .सोसायटीचे अध्यक्ष .श्री .नंदकुमार बेंडाळे , जनता बँक अध्यक्ष अनिल राव , आमदार – चंद्रकांतजी सोनवणे , प्राचार्य पी .आर . चौधरी , प्राचार्य वाय. जी .महाजन, डॉ .इरफान तडवी, धांडे कोचिंगचे प्रा.नेमिवंत धांडे व वडील सुभाष काशिनाथ सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.