<
जळगांव(प्रतिनीधी)- ले लो भाई चिवडा ले लो, अशी हाक देत प.न.लुंकड कन्याशाळेत शारदोत्सव अंतर्गत शनिवार दिनांक २१ रोजी आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थीनींना रोजगाराचे व व्यवसायाचे धडे मिळावे यासाठी दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो. आनंद बाजारात एकूण १९ स्टाँल धारक विद्यार्थीनींनी पानीपुरी, खमंग ढोकळे, चने, कचोरी, मुगाचे भजे, इडली, दहिवडे, केक, पोहे, भेळ, ज्यूस असे विविध पदार्थ शाळेतील विद्यार्थीनींना विक्री करून नफा मिळवला. आनंद बाजारातून विद्यार्थ्यांना रोजगारासाठी व्यवसाय किती महत्त्वाचा आहे हे सदर उपक्रमातून अनुभवता आले. आनंद बाजाराचे उद्घाटन शाळेच्या समन्वयिका पद्मजा अत्रे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी केले. आनंद बाजार कार्यक्रमाचे नियोजन समिती प्रमुख प्रवीण धनगर व उपप्रमुख ए.पी.सोनवणे यांनी केले. सदर कार्यक्रमास व्ही.एस.पाटील, किशोर चौधरी, दिनेश वैद्य यांनी परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.