<
अनुभूती स्कूलच्या ‘एड्युफेअर- 2019’ चा 25 रोजी समारोप;पालकांसह विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
जळगाव- (प्रतिनिधी) – अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ‘एड्युफेअर-२०१९’चा अवधी पालक व विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर खान्देश सेंट्रल मॉलच्या हिरवळीवर सुर असलेल्या या शैक्षणिक जत्रेचा आज दि. २५ ला समारोप आहे. इजिप्त दर्शन, ऑप्टीकल इल्युजन्स, मनोरंजक जादूच्या प्रयोगासह टॅलेंट शो मधील त्रिपूरामधील होजागिरी नृत्याने उपस्थितांनी धमाल केली. खेळता-खेळता शिकण्याच्या संकल्पनेसह जळगावकर समरस झाले.
अनुभूती इंग्लिश मिडियम स्कुल प्रायमरी व सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला ‘एड्युफेअर -2019’ मध्ये ८० पेक्षा जास्त अद्वितीय खेळ आहेत. अफलातून टॅलेन्ट शो, विलोभनीय हस्तकलांच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती. ऐरणीच्या देवा या महाराष्ट्रीयन गितांवर त्रिपूरा राज्यातील होजागिरी नृत्य, विशिष्ट पॅरमिटसह सादर करित होते. उखड बसुन अवघड असलेले युक्रेयीन देशातील लोकनृत्यही टॅलेंट शोमध्ये पाहायला मिळत आहे. जापान, कोरिया, साऊथ आफ्रिका, इटली, भारतातील महापुरूषांच्या विविध भाषांमधील गोष्टींमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. वाद्यांची माहिती देऊन तिच वाद्य जादूच्या बूक मधून समोर येण्याचा अनुभव घेता येता आहे. पक्षी, निसर्ग यांच्याशी मानवाचे नाती सांगणारे टॅलेश शो मधील ‘म्यायु, म्यायु निरंजन नाटक’ अंधश्रद्धेवर भाष्य करते. कोकणी भाषेच्या गाणांवर समईचे बॅलन्सीग नृत्य आपल्या संस्कृतीचे दर्शन करते. विज्ञान, गणितासोबतच भूमितीय ज्ञानाचा संस्कार एड्युफेअरमधुन विद्यार्थ्यांवर होत आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
25 रोजी समारोप
पुस्तकी शिक्षणाचा समाजातील वास्तव जीवनाशी संबंध जोडता यावा, यासाठी विद्यार्थ्यांनी, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘एड्युफेर-२०१९’ या शैक्षणिक जत्रेचा उद्या दि. २५ ला समारोप होणार आहे. दुपार ३ रात्री ९ वाजेपर्यंत जळगावकरांना भेट देता येणार आहे.