<
राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन
एरंडोल(प्रतिनीधी)- जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते असत्य असते ते अदृश्य होते अशी बहुमुल्य शिकवण जीवनात सर्वांना देणारे साने गुरुजी हे माय मनाचा बाप माणूस होते, त्यांना सर्वांनी सर्वार्थाने समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापुर ता. एरंडोल येथे त्यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त आयोजित विद्यार्थी माहिती उपक्रमात बोलताना राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी केले. यावेळी सुरेश भील, सुभाष भील, सुनील भिल, सखाराम सोनवणे तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते. पुढे बोलताना शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा उदयन्मुख कवी लेखक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, पत्री या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींनी देशभक्तीची ज्वाला पेरली. समाजातील जातिभेद अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. १९२८ साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. १९४८ साली त्यांनी साधना साप्ताहिक सुरु केले. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. छात्रालय काही मुले कपडे व्यवस्थित ठेवत नसेल तर स्वतः सानेगुरुजी त्यांची कपडे धुवायचे व्यवस्थित ठेवायचे. त्यांचा आदर्श प्रेरक आहे. त्यांनी स्वतःच्या जगण्यातून जीवनातून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले त्यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांच्या विचारांचा जागर होणार आहे पूज्य साने गुरुजींचे विचार जगण्याची गरज आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.