<
जळगाव(प्रतिनीधी)- येथील के.के ऊर्दू हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन प्राचार्य शमीम मलीक यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. या वेळी त्यानी उपस्थितांना ग्राहकांचे अधिकार, ऑनलाईन खरेदी विक्री करताना घ्यावयाची काळजी, महिलांनी खरेदी करताना सुरक्षितता साठी कसे जागरूत रहावे या विषयी माहिती देताना सविस्तर मार्गदर्शन केले. अकिल खान, मुश्ताक भिसती, यांनी हि ग्राहक तक्रार मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, चा परिचय देऊन बाजारपेठे ची सध्यास्थिती चा परिचय दिला. फाएजा जब्बार, फरजिन गुलाम मूसतूफा, सानिया मूसतूफा, शाईसता खान यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक दिना विषयी माहिती दिली, तसेच ग्राहकांना जागरूक राहण्याचा संदेश दिले. यशस्वीतेसाठी असमा शेख, तबरेज शेख यांच्या सोबत उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.