<
बैठकीला उपस्थित राहण्याचे अध्यक्ष- अशोकराव चव्हाण यांचे आवाहन
मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त-महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी-अधिकारी(अ ते ड) संघटना, मुंबई-३२ या संघटनेच्यावतीने दिनांक ५जानेवारी २०२० रविवार रोजी सकाळी १० वाजता बृहन्मुंबई महापालिका शाळा, भाभा हॉस्पिटल समोर, बांद्रा(प)-मुंबई याठिकाणी बृहन्मुंबई महापालिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अ ते ड संवर्गातील शासकीय, निम-शासकीय आणि अनुदानीत/विना-अनुदानीत क्षेत्रात कार्यरत दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांची अतिशय महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमधे “बृहन्मुंबई महापालिका आणि राज्य शासकीय, निम-शासकीय तसेच अनुदानीत क्षेत्रात कार्यरत दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांना आप-आपल्या विभाग तसेच कार्यालयामध्ये निर्माण होणाऱ्या विविध समस्या तसेच अडी-अडचणींवर चर्चा करण्यात येणार असून आपल्या दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांच्या या सर्व समस्या तसेच अडचणी भविष्यकाळात कशाप्रकारे सोडविता येतील याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष-साईनाथ पवारसाहेब, राज्य उपाध्यक्ष-राजेंद्र आंधळेसाहेब, मुंबई विभागीय अध्यक्ष-अशोकराव चव्हाण, विनायकजी करणेसाहेब, आणि अन्य उच्चस्तरीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, नविन कार्यकारिणी देखील निवडण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व शासकीय, निम-शासकीय, अनुदानीत/विना-अनुदानीत क्षेत्रात कार्यरत तसेच मुंबई,ठाणे, पालघर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, नवीमुंबई परीसर आणि मुंबई विभागातील ज्या दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांना या शासन मान्यता प्राप्त संघटनेमधे कार्य करायची इच्छा आहे अशा सर्व दिव्यांग कर्मचारी-अधिकारी बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे मुंबई उपाध्यक्ष-संतोष जाधव, चतुर गल्हाटे, जी.एम.पवारसाहेब, सचिव-मुंजा गिरीसर, मुकेश पाटील, महिला प्रतिनिधी-आशा राठोड, नम्रता राठोड, भारती विरनोडकर, यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.