<
निवासी शाळांमध्ये प्रवेशसाठी 15 मार्च रोजी स्पर्धा परिक्षेचे आयोजन
जळगाव-(जिमाका) – आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या एकलव्य निवासी पब्लिक स्कूल, पेठरोड नाशिक, पिंप्रीसद्योदिन ता.इगतपुरी नंदुरबार, अजमेर सौदाणे, धडगाव, अक्कलकुवा येथे सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी ते 9 वी च्या वर्गांतील अनुशेष भरून काढण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद ता. अमळनेर जि.जळगाव व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गंगापूरी ता.जामनेर जि.जळगाव या दोन परिक्षा केंद्रांवर स्पर्धा परिक्षा रविवार 15 मार्च 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेदरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी 2019-2020 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5 वीत शिकत असून परिक्षेस प्रविष्ठ झालेले असून पुढील वर्षी इयत्ता 6 वी मध्ये आणि याच क्रमाने इयत्ता 7 वी ते 9 वी मध्ये प्रवेश घेणार असतील अशा इच्छूक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल याच्याकडे 25 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावेत. अर्जाचा नमुना प्रकल्प कार्यालय, यावल तसेच संबंधित मुख्याध्यापक व सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल या कार्यालयाच्या 02585-261432,262035 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.