<
जामनेर-(प्रतिनीधी) – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण तसेच मानव विकास संस्था पुणे (महाराष्ट्र शासणाची सायत्त संस्था) संस्थेमार्फत तारादूत गणेश समाधान म्हस्के यांनी कला,वाणिज्य आणि विदयान महाविद्यालय जामनेर येथे सारथी संस्थेची सविस्तर माहिती, ध्येय, धोरणे, कौशल्य विकास उपक्रम,फेलोशीप योजना, स्पर्धा परीक्षा साठी योजना, महिला सबलीकरण (आथ्रीक, सामाजीक, शैक्षणीक, मानसीक आरोग्य, स्वंयम रक्षण) या विविध विषयावर खेळता-जुळत्या वातारणामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी काँलेज चे प्राचार्य महोदय शिरीष पाटील,उपप्राचार्य कुलकण्री सर , व्हि. आर. भदाणे, कुटे सर, येणे सर उपस्थित होते प्रकाश सपकाळ सरांनी आभार व्यक्त केले. संस्थेचे मा.व्यवस्थापक डाँ. डी. आर. परिहार सर,प्रकल्प संचालक मा. श्री अशोक पवार सर, नाशिक जिल्हा प्रकल्प संचालक श्री संदिप खरे सर, प्रकल्प अधिकारी जळगांव जिल्हा श्रीमती. निता पाटील मँडम यांच्या मार्गदर्शना खाली काम करीत आहे.