<
भडगाव (प्रतिनीधी)- येथुन जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था भडगाव,संचलीत,गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थी चि.गणेश अरुण माळीच्या प्रयोगाची निवड विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे.
२६ ते २८ डिसेंबर २०१९ दरम्यान डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव खुर्द येथे पार पडलेल्या ९ व्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात चि.गणेश माळीने प्रयोग केलेल्या आधुनिक शेतीसाठी उपयुक्त असलेल्या “रोप लागवड यंत्र व खत व्यवस्थापन यंत्राची” परिक्षकांनी दखल घेऊन विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली आहे चि.गणेशला ह्या प्रयोगासाठी विद्यालयातील गणित तसेच विज्ञान शिकवणाऱ्या दिनेश विठ्ठलसिंग राजपूत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
चि.गणेशच्या या उत्तुंग अशा यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,अव्वर सचिव प्रशांत पाटील,संचालिका पुनमताई पाटील,प्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक टी.एस.पाटील,ए.एच.पवार,एस.पी.शिसोदे,आर.ए.नेरपगार आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छां दिल्या आहेत.