<
जळगाव- जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2020 या वर्षातील पहिला लोकशाही दिन सोमवार दि. 6 जानेवारी, 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून आपले तक्रार अर्ज सोमवार, दिनांक 6 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित लोकशाही दिनात सादर करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.