<
कानळदा/जळगाव(प्रतिनीधी)- ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय कानळदा येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक के.पी.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत, स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्करत्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक के.पी.चव्हाण उपमुख्याध्यापक के.एम.विसावे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी ६ वी ७ वीच्या विद्यार्थीनी गायकवाड भाग्यश्री, भोई गायत्री, धनगर रेणुका, सपकाळे कोमल, सपकाळे मानसी, गायकवाड अनामिका, सोनवणे प्रेरणा, सपकाळे पौर्णिमा व चव्हाण योगराज यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित लघुनाटिका व मनोगत व्यक्त केले. तसेच संगीत शिक्षक जी. एम.सपकाळे यांनी एक प्रेरणादायी गीत सादर केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना व्ही.जे.पवार मॅडम व आभार प्रदर्शन आर.व्ही.यांनी मानले.