<
जळगाव-दि.२०- येथील मू.जे.त य.च.म.मुक्त विद्यापीठाचे प्रथम,द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए, बीकॉम, एम.बी.ए. बी.लिब आणि एम.लिब. साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने १ जूनपासून सुरु झालेली होती, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निकालाची वाट न पाहता थेट प्रवेश घ्यावे असे , नाशिक विभागीय संचालकांनी सांगितले आहे तसेच विलंब शुल्कसह अंतिम प्रवेश मुदत ३१ जुलै २०१९ पर्यंत राहील युजीसी च्या नियमानुसार कोणतीही मुदतवाढ होणार नाही व सदरची प्रवेश लिंक बंद करण्यात येईल. असेहि ते म्हणाले आहे.तसेच एम.बी.ए. तिसरी व अंतिम फेरी प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत २४ जुलै २०१९ असून प्रवेश परीक्षा २८ जुलै रोजी online होईल. विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तत्काळ मु.जे.महाविद्यालयच्या अभ्यास केंद्रातील केंद्र सहाय्यक श्री.प्रवीण बारीयांचेशी संपर्क साधावा.प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या वेबसाईट (www.ycmou.digitaluniversity.ac) आहे , .विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीच्या आत लवकरात लवकर घ्यावा , असे प्राचार्य डॉ.यु.डी.कुलकर्णी व केंद्र संयोजक डॉ. ए.पी.सरोदे व डॉ.जुगलकिशोर दुबे मू.जे.महाविद्यालय यांनी कळविले आहे.
फोटो चुकीचा आहे, साहेब
OK फोटो डिलीट केला आहे.
धन्यवाद