<
जळगाव – (प्रतिनिधी)-येथिल समवेशीत शिक्षा समग्र शिक्षण, म.न.पा शिक्षण मंडळ जळगाव येथे लुईस ब्रेल जयंती साजरी करण्यात आली.
4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्स मध्ये लुईस ब्रेल यांचा जन्म झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघाताने त्यांना अंधत्व आले पण त्यावर मात करून त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. शिक्षणा मध्ये येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन उठावदार सहा थिम्बानवर आधारित स्पर्शाने वाचता येणारी लिपी शोधून काढली. जिचा उपयोग आज ही अंध व्यक्ती करतात व ती ब्रेल लिपी म्हणून प्रसिध्द आहे.
अशा धोर शास्त्रज्ञास अभिवादन करण्याकरिता प्रमुख अतिथि म्हणून प्रदेश सचिव महाराष्ट्र मनियार बिरादरी चे डॉ. अल्तमश शेख , श्री सुनील सरोदे , वसीम शेख , विशाखा जोशी , शादी कोडी , समाधान माळी , सूरज सडुण्के, धनराज पाटील हे उपस्थित होते.
या प्रसंगी लुईस ब्रेल यांचा विषयी माहिती देन्यात आली.