जळगाव-(जिमाका) – दरवर्षीप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजनाचे ठिकाण, कालावधी, विजयी स्पर्धकांना मिळणारे पारितोषिकाची माहिती पुढीलप्रमाणे. स्थळ:-एस.एम.जोशी महाविद्यालय, पुणे, कालावधी-16 ते 18 जानेवारी, 2020, पारितोषिके-अनुक्रमे 10 हजार, 9 हजार, 8 हजार, 7 हजार, 6 हजार अशाप्रकारे आहेत. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा. कालावधी-22 ते 24 जानेवारी, 2020 असून पारितोषिके अनुक्रमे रूपये 15 हजार, 10 हजार, 5 हजार तसेच सन्मानार्थ रूपये 3 हजार अशाप्रकारे आहेत. अधिक माहिती शिक्षण संस्थेच्या www.erayat.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. असे रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्राचार्य आर. के. शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.