<
कानळदा – ता.जळगाव-(प्रतिनीधी) – येथील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय कानळदा येथे स्काऊट-गाईड विभागातर्फे ‘एकदिवसीय शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.के.पी.चव्हाण सरांच्या शुभहस्ते बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के.पी.चव्हाण सर,उपमुख्या.श्री.के.एम.विसावे सर,जेष्ठ शिक्षण श्री.एन.एच.बाविस्कर सर यांच्या उपस्थितीत स्काऊट-गाईड विभागातर्फे ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी देण्यात आली.एकदिवशीय शिबिरांतर्गत स्काऊट-गाईड चळवळीचा इतिहास,शिबिराचे महत्व,बी.पी.व्यायाम प्रकार या विषयाच्या तासिका घेण्यात आल्या.तसेच बीनभांड्यांची स्वयंपाक स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धकांनी अतिशय रुचकर व वेगवेगळे पदार्थ बनविले. शेकोटी कार्यक्रमातून स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, स्त्रीभ्रूणहत्या यावर आधारित समूहनृत्य सादर केले. शिबिराप्रसंगी विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड विभाग प्रमुख श्री. बी. ए. सपकाळे सर, सौ. जे.डी. पवार मॅडम, श्री.जी. एम. सपकाळे सर, सौ.एल.व्ही.राणे मॅडम, श्रीम.व्ही.जे.पवार मॅडम व श्री.एम.जे.पाटील सर यांचे चांगले मार्गदर्शन लाभले.स्काऊट-गाईडचे विद्यार्थी शिस्तीत व जबाबदारीने कार्य करतांना अतिशय आनंदी दिसत होता.