<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांनी फुगे कवायत चे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना लहानपणापासून व्यायाम आणि कवायतची आवड निर्माण व्हावी यासाठी दर मंगळवारी फुगे कवायत चे आयोजन केले जाणार आहे. मनोरंजनातून शरीर सुदृढतेकडे नेणे हाच यामागचा उद्देश आहे. फुगे कवायत करताना विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला यावेळी दिसून आला. या कवायतीला विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. फुगे कवायत चे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले तर विद्यार्थ्यांना कवायत करण्याचे फायदे संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले. तर सहकार्य शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांच्यासह नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांचे लाभले.