<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुसुंबा खु येथील मुख्याध्यापक श्री. हेमंतकुमार सुरेश सोनार यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशन जळगाव तर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श शिक्षक सन २०१९ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव व उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांना फाऊंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांनी नियुक्ती पत्रकाद्वारे कळविले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मा. मनोजकुमार आत्माराम पाटील, संस्थेच्या सचिव सौ ज्योतिमाई मनोज पाटील व संचालिका कु प्रतिक्षा मनोज पाटील यांनी श्री सोनार यांचे अभिनंदन करून कौतुक केले.